वेद, वेदपाठशाळा, यज्ञशाळा, गोशाळा

वेद –

सृष्टी निर्माण झाली त्यावेळी हजारो वेदांच्या शाखा होत्या, त्यापैकी बऱ्याच शाखा या काळाच्या ओघात लुप्त झाल्या. सध्याच्या चालू काळात यापैकी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद अशा चार शाखा उपलब्ध असून त्यापैकी प्रत्येक वेदाला दोन संहिता आहेत.

ऋग्वेद – १) शाकल शाखा २) बाष्कल शाखा लुप्त झाली आहे

यजुर्वेद –

१) कृष्ण यजुर्वेद तैत्तिरीय शाखा

२) शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा

३) शुक्ल यजुर्वेद काण्व शाखा

सामवेद –

१) जैमिनीय

२) रानयनीय

३) कौथुम

 अथर्ववेद –

१) शौनक

२) पैलपाद

अशी उपलब्द असलेल्या वेदांची परंपरा आज भारतामध्ये कमी अधिक प्रमाणात आहे.

वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळा, वेदभवनमध्ये यापैकी ऋग्वेद शाकल संहितेच्या अध्ययन अध्यापनाची परंपरा चालविली जात आहे. या परंपरेमध्ये ऋग्वेद दशग्रंथ पदक्रमासहित ही परंपरा चालू असून गेली ७५ वर्षे हे कार्य अव्याहतपणे सुरु आहे. एका लहान जागेमध्ये हे कार्य सुरु होऊन पुण्यामध्ये कोथरूड भागात एका विस्तीर्ण दोन एकरच्या जागेवर हे कार्य १५ ऑक्टोबर १९८९ रोजी स्थलांतरित झाले असून गेली ३२ वर्षे हे कार्य या जागेमध्ये चालू आहे. ऋग्वेद दशग्रंथाचे अध्ययन १२ ते १५ वर्षाच्या काळात अध्ययनाच्या परंपरेप्रमाणे पूर्ण होते. यामध्ये ऋग्वेदीय नित्यविधी पासून सुरु होऊन ऋग्वेद संहिता, ऐतरेय ब्राह्मण, ऐतरेय आरण्यक, शिक्षा, ज्योतिष, छंद, आश्व्लायन गृह्यसूत्र, व आश्व्लायन श्रोतसूत्र, यास्क निर्जित निरुक्त, पाणिनीय अष्टाध्यायी, ऋग्वेद पदपाठ व ऋग्वेद क्रमपाठ असे हे अध्ययन आहे. आपल्या वेड परंपरेत वेदपाठशाळेत होणारे हे अध्ययन अध्यापनाचे कर हे गुरुकुल पद्धतीने म्हणजे विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था एके ठिकाणी असून शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य व वस्त्र इ. गोष्टी ह्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न स्वीकारता केले जाते आणि त्यामुळे ह्या वेदविद्येच्या अध्ययन अध्यापनालाच केवळ विद्यादान हा शब्द लागू पडतो. वेदपाठशाळेला कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान नसून केवळ वेदपुरुषाच्या आणि वेदनारायणाच्या कृपेमुळे व जनता जनार्दनाच्या सहकार्यामुळे हे कार्य चालू आहे. या वेदाचार्य श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळेची स्थापना वेदमहर्षी कै. विनायकभट्ट घैसास गुरुजी यांनी केली त्यानंतर त्यांचे चिरंजीव व त्यांच्यापाशी ऋग्वेद दशग्रंथ, क्रमांतचे अध्ययन पूर्ण केलेले मोरेश्वर घैसास हे ही परंपरा पुढे चालवतील. अशा या अलौकिक वेड अध्ययन अध्यापनाचे कार्य आमच्या वेदपाठशालेले तर्फे केले जात आहे. भविष्यात वेदभावनाच्या परिसरात यजुर्वेद, सामवेद, व अथर्ववेद यांच्या अध्ययन, अध्यापनाची परंपरा सुरु करण्याचा विचार आहे.

यज्ञशाळा –

वेदपरंपरेत यज्ञशाळा ही अविभाज्य भाग आहे कारण वेदमंत्रांची अनुष्ठाने नित्य नैमित्तिक कर्मे ही यज्ञाच्या माध्यमातूनच केली जातात. आपल्याकडे वेदमंत्र अनुष्ठानाला जप, हवन, तर्पन, मार्जन, विप्रभोजन असे असून या पंचांगाला फार महत्व आहे. यामध्ये कुठल्याही मंत्राचे जपरुपी अनुष्ठान केले तर त्याचे फळ मिळण्यासाठी जपसंख्येच्या दशांश पद्धतीने हवन, तर्पन, मार्जन, विप्रभोजन केलेच पाहिजे तरच त्याचे फळ प्राप्त होते आणि म्हणून विद्यापीठात जशी विज्ञान शाखेमध्ये प्रयोगशाळा असते तशीच वेदमंत्रांचे सामर्थ्य प्रयोग रूपाने सिद्ध करण्यासाठी यज्ञशाळेची आवश्यकता असते. आपल्या वेदपरंपरेत ब्रह्मचार्य आश्रमात नित्य अग्निकार्य, गृहस्थाश्रमात नित्य गृह्याग्नी होम आणि ऐच्छिक असा श्रौत होम हे महत्वाचे अग्निकार्य आहे. त्यामुळे यज्ञ शाळेचे महत्व हे अधोरेखित होते. वेदभवनमध्ये यापैकी गृह्याग्नी (स्मार्ताग्नि) असून वे.मू. मोरेश्वर घैसास यांनी ते व्रत स्वीकारले असून नित्य सायं, प्रात: होम व प्रतिपदेला स्थालीपाक (इष्टी) केली जाते.

गोशाळा –

आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये गाईचे महत्व फारच म्हणजे अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या वैदिक जीवनाचा तो एक अविभाज्य भाग मनाला गेले असून गाय ही आपल्या कुटुंबातील एक सदस्यच आहे त्यामुळे गोसेवेचे महत्व व त्यातून मिळणारे पुण्यकारक भाग आपले जीवन बदलून टाकतो. गायीची सेवा म्हणजे गाईचे नित्य दर्शन, तिच्या पाठीवर हात फिरवून तिला नमस्कार करणे, तिला घास देणे असे सेवेचे अनेक भाग आहेत. गाईचे दूध व त्यापासून हलणारे विविध घटक यामध्ये दूध, दही, साय, लोणी व तूप हे एकापेक्षा एक म्हणजे ज्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. या सर्वांमध्ये विशेष गुण सांगितले आहेत पण त्याचबरोबर गाईचे गोमूत्र व गोमय यातूनही मानवाला अनेक गोष्टी प्राप्त होतात. गोमूत्र सेवनाने अनेक व्याधी ह्या नष्ट होतात. गोमूत्राबद्धल एक श्लोक प्रचलित आहे. गोमूत्र कसे हवे? आग्रं मग्रं — असे गोमूत्राचे महत्व आहे. गोम्याचे महत्व देखील तितकेच आहे. गोमयाच्या शुभा (गोवरी) याचा यज्ञयागांमध्ये इंधन म्हणून उपयोग केला जातो. त्याचा धूर देखील सर्व वातावरण शुद्ध करतो असे हे निर्माण करणारी गाय ही मानवाच्या नव्हे तर अखिल विश्वाच्या कल्याणासाठी निर्माण केली असून तिला कामधेनू म्हणतात. त्यामुळे इतिहास, पुराणांमध्ये ऋषीमुनींच्या आश्रमात मोठ्या संख्येने गायी असत व देवता, राजे विविध कर्मानुसं ऋषीमुनींना, विप्रांना गोल्डन करीत असत व ह्या सर्व त्यांच्या आश्रमातून गुरुकुलातून मोठ्या प्रमाणावर असत व तशी गोशाळा वेदभवनात आहे.